
आज (बुधवार) सकाळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन केंद्राच्या पॅकेजच्या नावाबाबत मराठी आणि इंग्रजी या दाेन्ही भाषेत टीका केली आहे.
सातारा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने काही पॅकेजची घाेषणा केली आहे. या पॅकेजच्या नावावरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.
चव्हाण म्हणतात जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हणले नाही. पण आपल्या भारतात मात्र...
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (ता.३१ मार्च) कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सरपंचांशी संवाद साधला. आमदार चव्हाण यांनी गावातील सद्यस्थितीची माहिती घेतली. शासनाच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समित्यांच्या कामाचीही माहिती घेत शासनाच्या योजनांबद्दल सरपंचांना माहिती दिली.
दारिद्र्य रेषेखालील लोकांना पाच किलो धान्यासह मोफत रेशनिंग, उज्वला योजनेतर्फे तीन महिन्यात तीन गॅसच्या टाक्या मोफत मिळणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, गावातील लोकांना योजनांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाबद्दल ग्रामस्थांत जागृती व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायतीने उपक्रम राबवाववेत. आमदार चव्हाण स्थितीबद्दल राज्याच्या सचिवांसोबत बोलून आढावा घेत आहेत. त्यांना उपयुक्त सूचना देत आहेत. त्यासोबत आमदार चव्हाण जिल्ह्यातील आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षाक व आरोग्य अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहेत.
आज (बुधवार) सकाळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन केंद्राच्या पॅकेजच्या नावाबाबत मराठी आणि इंग्रजी या दाेन्ही भाषेत टीका केली आहे. ते म्हणतात जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेज ची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हणले नाही. पण आपल्या भारतात मात्र आर्थिक पॅकेज हे #PMGaribKalyan पॅकेज आहे.
जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेज ची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हणले नाही. पण आपल्या भारतात मात्र आर्थिक पॅकेज हे #PMGaribKalyan पॅकेज आहे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 1, 2020