राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? : पृथ्वीराज चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण

'निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं'

राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? : पृथ्वीराज चव्हाण

मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष वाढला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले असून न्यायालयाकडून निर्णय आल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णय प्रक्रियेवर आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत बोलत होते.

राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दिरंगाई अनाकलनीय आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे काय चाललंय हेच कळत नाही. राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. न्यायालाकडून निकाल येईल असं अपेक्षित होतं. पण राज्यातील हा सत्तासंघर्ष फारच लांबलचक आणि गुंतागुंतीचा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: होमलोनसह सर्व कर्जे महागणार; RBI कडून रेपो दरात वाढीची घोषणा

पुढे ते म्हणाले की, निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडही होऊन गेलेली आहे. पण आता या घटना पुन्हा मागे घेता येणार आहेत का, असंही त्यांनी विचारलं आहे.

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाकडून कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित करत, पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही, असा युक्तिवाद केला. तर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, या प्रकरणांचा निकाल आपणच द्यावा, मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची गरज नाही, असं मत मांडलं आहे.

हेही वाचा: देशातील काँग्रेसनं 70 वर्षांत जे कमावलं ते भाजपानं 8 वर्षात संपवल; राहुल गांधींचा घणाघात

Web Title: Prithviraj Chavan Criticize To Decision Of Supreme Court Of Shiv Sena Dispute In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..