esakal | लॉकडाउनविरोधात सांगलीकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

protest against sangli people lockdown and shops closed on collector office

लॉकडाउन हटवा अशा घोषणा देण्यात आल्या. व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला.

लॉकडाउनविरोधात सांगलीकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : शासनाच्या अन्यायी लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. कामगारांना जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे लॉकडाउनविरोधात व्यापारी, हातगाडीवाले, हॉटेल व्यावसायिक, जीम चालक आदींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सकाळी 10 वाजता विश्रामबाग चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. आम्ही सांगलीकर असा फलक घेवून विश्रामबाग चौकातून मोर्चा निघाला. लॉकडाउन हटवा अशा घोषणा देण्यात आल्या. व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला.

मोर्चात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, नगरसेवक शेखर इनामदार, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, व्यापारी नेते अतुल शहा व जीम चालक यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा - ब्रेकिंग; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त, जिल्हाधिकारी प्रशासक

मोर्चावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिष्टमंडळ निवेदनासह जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना भेटण्यात आले.
 

loading image