आटपाडी : येथील सांगोला चौकात बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हटवल्याच्या निषेधार्थ आंबेडकरप्रेमींनी मुंबईकडे ‘लाँग मार्च’ काढला. गेली पाच दिवस ‘लाँग मार्च’ सुरू असून यात २८ महिला, पुरुष सहभागी झालेत. वाटेत येणाऱ्या गावागावांत त्यांची भोजन आणि निवाऱ्याची सोय केली जात आहे.