Anil Jadhav murder case : अनिल जाधव खूनप्रकरणी उद्या पोलिस ठाण्यावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

protest towards police station tomorrow case of Anil Jadhav murder sangli

Anil Jadhav murder case : अनिल जाधव खूनप्रकरणी उद्या पोलिस ठाण्यावर मोर्चा

तासगाव : शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी अनिल जाधव यांचा खून होऊन सव्वा महिना उलटून गेला तरीही मुख्य संशयित पोलिसांना सापडत नाहीत. पोलिस त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याने शिवसेनातर्फे सोमवारी (ता. १२) पोलिस ठाण्यावर मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जाधव कुटुंबीय आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत दिली. या गुन्ह्यातील दोन्हीही मुख्य संशयित राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. अनिल जाधव यांची ४ ऑगस्ट रोजी विश्वासघाताने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

प्रमुख हल्लेखोरांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याने येथील बस स्थानक चौकात ‘रास्ता रोको’ही करण्यात आला. या वेळी पोलिस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी चार-पाच दिवसांत मुख्य संशयितांसह इतर सर्वांना पकडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हत्येच्या महिनाभरानंतरही या हत्येचा मुख्य सूत्रधार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष कमलेश तांबेकर, प्रमोद थोरात यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. राष्ट्रवादीकडून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे दिसून येत आहे. पसार असलेले दोन्हीही संशयित राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. त्यांना पसार ठेवण्यात राष्ट्रवादीचा हात असावा. याच पक्षाचे नेते पोलिसांवर राजकीय दबाव आणत आहेत. म्हणूनच गेल्या महिनाभरात पोलिसांनी मुख्य संशयितांना पकडलेले नाही.

दरम्यान, या प्रकरणात भाजपची भूमिकाही संशयास्पद आहे. जाधव हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांच्या हत्येनंतर भाजपने ज्यापद्धतीने हे प्रकरण हाताळायला पाहिजे, त्या पद्धतीने हाताळले गेले नाही. या प्रकरणात पोलिसांना मुख्य संशयितांना पकडण्यात अपयश आल्याने सोमवारी सायंकाळी पोलिस ठाण्यावर मशाल मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी जाधव कुटुंबीय व मंडळाच्या सदस्यांनी दिला. या वेळी शिवसेनेचे संदीप गिड्डे-पाटील, उपाध्यक्ष शीतल पाटील, संदीप सावंत, आशिष जाधव, आदित्य जाधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Protest Towards Police Station Tomorrow Case Of Anil Jadhav Murder Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..