बँकेची चौकशी गुंडाळण्याची भीती; पाटलांवर पवारांचे टिकास्त्र

pruthviraj pawar,jayant patil
pruthviraj pawar,jayant patilsakal
Updated on

सांगली : जिल्हा बँकेतील व्यवहारावर आमदार मानसिंगराव नाईक यांनी संशय व्यक्त केल्यामुळे सभासद, शेतकरी, ठेवीदार हादरले आहेत. बँकेने वाटप केलेल्या बिगरशेती कर्जाची, एकरकमी कर्ज माफीची यादी जाहीर करावी. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने कितीही काळा कारभार असला तरी तो दडपला जाण्याची भीती आहे, अशी टीका सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले,‘‘आमदार नाईक, शेतकरी नेते सुनील फराटे यांच्या तक्रारीनुसार चौकशी लागली खरी, मात्र बँकेतील सत्य बाहेर येईल, असे वाटत नाही. याआधी १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी दडपली गेली. आता आम्ही तसे होऊ देणार नाही. बँकेच्या व्यवस्थापनाने आणि सध्याच्या संचालक मंडळाने बँकेतून दिलेल्या बिगर शेती कर्जाची संपूर्ण माहिती बिनशर्त जाहीर करावी. पारदर्शी कारभार असेल, निकषांनुसारच पुरेसे तारण घेऊन कर्ज दिले असेल तर ही माहिती लपवावी लागणार नाही. पुष्पराज चौकात शेतकरी मेळावा घ्यावा व डिजिटल फलकावर माहिती जाहीर करा, हवा तर त्याचा खर्च आम्ही करतो.’’

ते म्हणाले, ‘‘बँकेतील सत्तेसाठी सर्वपक्षीय नेत्यांना सांभाळून घेण्याचे जयंतरावांचे धोरण आहे. सत्तेसाठी लोकांचा पैसा ते हवा तसा वाटत आहेत. ज्या कारखान्यांची, उद्योगांची ऐपत नाही; जे आधीच कर्जाखाली दबले आहेत त्यांना पुन्हा कोट्यवधीची कर्जे दिली आहेत. राजकीय बड्या कर्जदारांना ओटीएसचा लाभ देऊन बँकेचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. अधिकारी व कर्मचारी दडपणाखाली आहेत. जयंत पाटील यांची राजारामबापू बँक अशीच चालते का? तेथे कायदा कडक असेल तर जिल्हा बँक वाऱ्यावर कशासाठी?’’

pruthviraj pawar,jayant patil
KDCC Election: ए. वाय. पाटलांना शह देण्यासाठी काँग्रेसचा पवित्रा

कदम यांनी वाचवली...

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे धाडस दाखवले. बॅंक बुडता बुडता वाचली. प्रशासकांनी बँकेला आर्थिक शिस्त लावली होती. आता पुन्हा नोकरभरती, कर्जवाटप, कर्ज माफी यातून बँकेने नवे प्रश्‍न निर्माण केले आहेत. मानसिंगराव नाईक यांचीच तक्रार असल्याने त्याला आता साक्षीदारांची गरजच नाही. जत, सर्वोदय व अन्य कारखान्यांप्रमाणे जिल्हा बँकेची वाट लागू नये.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com