'सत्तेसाठी नेत्यांना सांभाळण्याचं जयंतरावांचं धोरण'

'सत्तेसाठी नेत्यांना सांभाळण्याचं जयंतरावांचं धोरण'
Updated on
Summary

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने कितीही काळा कारभार असला तरी तो दडपला जाण्याची भीती आहे

सांगली : जिल्हा बँकेतील व्यवहारावर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी संशय व्यक्त केल्यामुळे सभासद, शेतकरी, ठेवीदार हादरले आहेत. बँकेने वाटप केलेल्या बिगरशेती कर्जाची, एकरकमी कर्ज माफीची यादी जाहीर करावी. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने कितीही काळा कारभार असला तरी तो दडपला जाण्याची भीती आहे, अशी टीका सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, 'आमदार नाईक, शेतकरी नेते सुनील फराटे यांच्या तक्रारीनुसार चौकशी लागली खरी, मात्र बँकेतील सत्य बाहेर येईल, असे वाटत नाही. याआधी १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी दडपली गेली. आता आम्ही तसे होऊ देणार नाही. बँकेच्या व्यवस्थापनाने आणि सध्याच्या संचालक मंडळाने बँकेतून दिलेल्या बिगर शेती कर्जाची संपूर्ण माहिती बिनशर्त जाहीर करावी. पारदर्शी कारभार असेल, निकषांनुसारच पुरेसे तारण घेऊन कर्ज दिले असेल, तर ही माहिती लपवावी लागणार नाही. पुष्पराज चौकात शेतकरी मेळावा घ्यावा व डिजीटल फलकावर माहिती जाहीर करा, हवा तर त्याचा खर्च आम्ही करतो.'

'सत्तेसाठी नेत्यांना सांभाळण्याचं जयंतरावांचं धोरण'
"भाजपच्या निलंबित आमदारांना परत आणण्यासाठी राज्यपालांची धडपड"

ते म्हणाले, 'बँकेतील सत्तेसाठी सर्वपक्षीय नेत्यांना सांभाळून घेण्याचे जयंतरावांचे धोरण आहे. सत्तेसाठी लोकांचा पैसा ते हवा तसा वाटत आहेत. ज्या कारखान्यांची, उद्योगांची ऐपत नाही; जे आधीच कर्जाखाली दबले आहेत त्यांना पुन्हा कोट्यवधीची कर्जे दिली आहेत. राजकीय बड्या कर्जदारांना ओटीएसचा लाभ देऊन बँकेचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. अधिकारी व कर्मचारी दडपणाखाली आहेत. जयंत पाटील यांची राजारामबापू बँक अशीच चालते का? तेथे कायदा कडक असेल तर जिल्हा बँक वाऱ्यावर कशासाठी?'

कदम यांनी वाचवली...

पृथ्वीराज पवार म्हणाले, 'ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे धाडस दाखवले. बॅंक बुडता बुडता वाचली. प्रशासकांनी बँकेला आर्थिक शिस्त लावली होती. आता पुन्हा नोकरभरती, कर्जवाटप, कर्ज माफी यातून बँकेने नवे प्रश्‍न निर्माण केले आहेत. मानसिंगराव नाईक यांचीच तक्रार असल्याने त्याला आता साक्षीदारांची गरजच नाही. जत, सर्वोदय व अन्य कारखान्यांप्रमाणे जिल्हा बँकेची वाट लागू नये.'

'सत्तेसाठी नेत्यांना सांभाळण्याचं जयंतरावांचं धोरण'
संसदीय लोकशाहीला हे मारक; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com