'यांना' खाली खेचा आणि ठेचा : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) कराड येथे दाैरा केला. त्यावेळी त्यांनी भाषणात काहींचा समाचार घेतला.

कऱ्हाड - भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्करांना खाली खेचा ठेचा असे वादग्रस्त वक्तव्य माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) येथे केले.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप जिल्हाध्यक्षाने कराडमधील प्रचारसभेत मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजेंनी आज (गुरुवार) येथे येऊन माफी मागितली. इतकंच नाही तर त्या प्रचारसभेवेळी जर आपण उपस्थित असतो, तर भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचलं असतं असेही स्पष्ट केले.

मनाेमिलनात उदयनराजेंचा करिष्मा ; येथे पिछेहाट

उदयनराजे म्हणाले, “माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केलं नाही, दुसऱ्याने केलं, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मतितार्थ एवढाच की समाज एकत्र राहायला नको. भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावार विरजण टाकलं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Pull' Them Down And Crush Them Says Udayanraje