मनोमिलनात उदयनराजेंचा करिष्मा ; ' येथे ' पिछेहाट

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 31 October 2019

यापुर्वी या भागात उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा अधिक प्रभाव होता परंतु तो मतदानातून दिसत नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
 

सातारा : सातारा येथे नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मनोमिलनामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात भरघोस मते मिळाली. सातारा पालिका क्षेत्रात शिवेंद्रसिंहराजेंना 31 हजार 979 तसेच माजी खासदार उदयनराजेंना 33 हजार 855 मते मिळाली आहेत. दाेन्ही नेत्यांच्या मतांचा विचार केला तर शहर व परिसरात उदयनराजेंचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.

शाहूपूरी करंजे या ठिकाणी उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा 248 मते, करंजे तर्फ सातारा येथे 218 मते आणि सातारा शहर (सर्व पालिका वॉर्ड) येथे 3786 मते असे एकूण 4252 मते जादा मिळाली आहेत.

गोडोली ग्रामीण या भागात शिवेंद्रसिंहराजेंना उदयनराजेंपेक्षा 147 मते जादा मिळाली आहेत.
 
दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनापुर्वी पासून शाहूपूरी ग्रामपंचायत, करंजे गाव तसेच सातारा शहरात नेहमीच माजी खासदार उदयनराजेंच्या पारड्यात शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा जादा मते देतात याचा पुर्वानुभव सर्वांनाच आहे.

दूसरीकडे गोडोली हा भाग उदयनराजेंना आणि शिवेंद्रसिंहराजेंना मानणारा आहे. यापुर्वी या भागात उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा अधिक प्रभाव होता परंतु तो मतदानातून दिसत नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

पालिका क्षेत्रात शिवेंद्रसिंहराजेंना येथून  झाले कमी मतदान 
 

उमेदवारांना एकूण मिळालेली मतदानाची आकडेवारी
  उदयनराजे भोसले श्रीनिवास पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले दीपक पवार
शाहूपूरी करंजे 4432 2898 4389 3103
करंजे तर्फ सातारा 2457 1357 2331 1449
गोडोली ग्रामीण 3664 3383 3613 3185
सातारा पालिका 33855 19401 31979 21311

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanrajen ahead in votes than shivendrasinhraje satara constituency