esakal | पुणे-बंगलोर महामार्गावर पीपीई किट रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

On the Pune-Bangalore highway, corona victims throw used PPe kits on the road

वापरलेले पीपी ई किट रस्त्यावर फेकून दिल्यामुळे वाहनधारकांची भंबेरी उडाली

पुणे-बंगलोर महामार्गावर पीपीई किट रस्त्यावर

sakal_logo
By
विजय लोहार

 नेर्ले (सांगली): येथील पुणे-बंगलोर महामार्गावर कुणी अज्ञाताने कोरोना ग्रस्तांना वापरलेले पीपी ई किट रस्त्यावर फेकून दिल्यामुळे वाहनधारकांची भंबेरी उडाली.वाळवा तालुक्यात कोरोणाचा प्रसार वाढत असतानाच महामार्गावर हे किट पडल्यामुळे लोकांच्यात भीती निर्माण झाली आहे.


काल  दुपारी हे किट पडल्याचे निदर्शनास आले. पुणे बेंगलोर महामार्गावर इस्लामपूर, कोल्हापूर, आणि कराड या ठिकाणी कोरोनावर उपचारासाठी विविध रुग्णालय आहेत. तर सांगली आणि सातारा या ठिकाणी शासकीय रुग्णालय उभे केलेले आहेत. तर काही गावांमध्ये केअर सेंटर लोकांच्या सहकार्यातून उभी होत आहेत. एकीकडे डॉक्टर व प्रशासन कोरोनाग्रस्तांसाठी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत असताना दिसून येत असतानाच असे पीपीई किट अशा पद्धतीने काही लोक रस्त्यावरती फेकून  देत आहेत.काही समाज कंठक समाजाचा विचार करत नसल्याचे  चित्र आहे. याबाबत कामेरीचे दिलीप क्षीरसागर यांनी आधार फाउंडेशन चे अध्यक्ष विजय लोहार यांना याबाबत कल्पना दिली.यावेळी संतोष खरमाटे, विशाल पाटील हे घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावरती पडलेले ते पीपीइ कीट काठीच्या साह्याने बाजूला घेऊन ते जाळून नष्ट केले.

हेही वाचा- राजू शेट्टींची ७२२७ देतेय साथ देण्याचा संदेश -

यावेळी या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला लोकांनी असं बेफिकिरीने वागू नये. दुसऱ्याची काळजी घ्या  कोरोणाला घाबरू नये असे यावेळी सांगण्यात आले. 

संपादन - अर्चना बनगे