esakal | पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : पुणे बंगळूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाले. बुधवार (ता.८) रात्री १२ च्या सुमारास हा अपघात घडला आहे.आहे. श्रीनाथ दिगंबर पवार (वय २१ रा. चव्हाट गल्ली ) आणि रचित रंजन डूमावत (वय २१ सदाशिवनगर) अशी मयतांची नावे आहेत.

हेही वाचा: राज्यभरातून 3 लाखांवर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्याशेजारी बुधवार (ता.८) मध्यरात्री बाराच्या दरम्यान हा अपघात घडला घडली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे. श्रीनाथ हा येथील लिंगराज कॉलेजमध्ये बी .कॉमचे शिक्षण घेत होता. श्रीनाथ यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सकाळी ११ वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अपघाताची नोंद उत्तर रहदारी पोलिस ठाण्यात झाली आहे.

loading image
go to top