

Kognoli Toll Plaza Traffic Update Heavy Vehicles Stopped After Farmers Protest At Kinni Causes Long Queues On Highway
esakal
कोगनोळी : शेतकरी संघटनेच्या वतीने किनी टोलनाक्यावर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने कोगनोळी टोलनाका परिसरात मोठी वाहने अडवून ठेवली आहेत. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.