

Hydrological Infrastructure Failures: Structural Defects Discovered in Maan’s Rainwater Harvesting Slabs
Sakal
गोंदवले : अगदी बालपणापासूनच पाणी बचतीचे महत्व समजावे आणि पावसाच्या पाण्याची साठवणूक करून त्याचा पुनर्वापर व्हावा या उद्देशाने शासनाने सक्षम अंगणवाडी योजनेतून इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा बसविण्याची योजना आणली खरी ; परंतु माण तालुक्यात मात्र या योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे नेमकं कुणाला 'सक्षम'करण्यासाठी ही योजना आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे महिला व बालकल्याण विभाग याबाबत अद्यापही गंधारीच्याच भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.