Video : पाडेगावमध्‍ये खून; मृत पुण्‍यातील व्‍यापारी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

मृत अनोळखी इसम हे पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी असल्याचे पुढे येत असून, त्यांचे लक्ष्मी रोडवर शूज विक्रीचे दुकान असल्याचे समजते आहे.

लोणंद :  पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत नीरा उजवा कालव्या लगत एका ४५-५० वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आज (ता. पाच) सकाळी लोणंद पोलिसांना आढळून आला आहे. या इसमाच्या छातीवर गोळ्या झाडून त्याचा खून करून कोणीतरी अज्ञातांनी येथे आणून टाकल्याचे दिसत आहे. या घटनेने या परिसरास खळबळ उडाली आहे. 

हे वाचा : मुंबईचा व्यापारी पुण्यात आला, रिक्षात बसला अन्.....

लोणंद पोलिसांनी घटनास्थळी जावून त्‍याचा पंचनामा केला असून, अधिक तपास करत आहेत.
 जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या समवेत लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी व सहकारी घटनास्थळावर त्वरीत पोचून तपासाची यंत्रणा गतीने राबवत आहेत.

हेही वाचा : Video : येथे आजही अंधश्रध्‍देचा कहरच...
 दरम्यान, मृत अनोळखी इसम हे पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी असल्याचे पुढे येत असून, त्यांचे लक्ष्मी रोडवर शूज विक्रीचे दुकान असल्याचे समजते आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Trader's Body Found In Padegaon