कोल्हापुरातील एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर त्याचे कारनामे उघड झाले आहेत. शहरातील एका घटस्फोटित महिलेला दुसरे लग्न (Marriage) करायचे असल्याने तिने आपला बायोडाटा संबंधित नोंदणी स्थळावर अपलोड केला होता.
कोल्हापूर : एका वधू-वर नोंदणी संकेतस्थळावर बायोडाटा अपलोड केलेल्या महिला, तरुणींशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) व शोषण करणाऱ्या पुण्याच्या (Pune) भामट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Investigation Branch) त्याला पुण्यातून अटक केली. फिरोज निजाम शेख (वय २८, रा. ६०२, बी विंग, आयडियल होम अपार्टमेंट, मिठानगर, कोंढवा, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे.