बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आर. वेंकटेशकुमार यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आर. वेंकटेशकुमार यांची नियुक्ती

sakal_logo
By
गिरीश कल्लेद

बेळगाव : बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी मंगळवारी (ता. १६) अधिकार पदाची सुत्रे स्विकारली. विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा: गडचिरोली - २६ नक्षलवाद्यांची नावे आली समोर; लाखोचं होतं बक्षीस

जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी मंगळवारी अधिकारपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर विधान परिषद निवडणुक तयारी आणि उमेदवारी अर्ज स्विकार प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बैलहोंगलचे प्रांताधिकारी शशिधर बगली उपस्थित होते. नुतन जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार गुलबर्गा येथील कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाचे सचिव असून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी म्हणून राज्य सरकारने त्यांची नेमणुक केली आहे.

loading image
go to top