
सांगली : सरकार कर्जमाफीची घोषणा करण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज फेड केली नसल्याने त्याचा परिणाम पीक कर्ज वितरणावर झाला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ३६ हजार ९२७ शेतकऱ्यांना ५६० कोटी ६२ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४४ टक्के झाली आहे.