RadhaKrishna Irrigation Project : कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद पेटला! कोल्हापुरातील प्रस्तावित धरणाला कर्नाटकचा तीव्र विरोध; कन्नड संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

RadhaKrishna Irrigation Project Krishna River dispute : महाराष्ट्राच्या राधाकृष्ण सिंचन प्रकल्पाला कर्नाटकातील कन्नड संघटनांनी विरोध केला आहे. कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होऊन आलमट्टीसह अन्य बंधाऱ्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra Karnataka Krishna River water dispute

Maharashtra Karnataka Krishna River water dispute

esakal

Updated on

बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर प्रस्तावित राधाकृष्ण सिंचन प्रकल्पांतर्गत (RadhaKrishna Irrigation Project) नवीन धरण बांधण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे कर्नाटकात येणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्यात घट होईल आणि चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ बंधारा, हिप्परगी बंधारा तसेच अालमट्टी धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होईल, असा दावा करत राज्य सरकारने तातडीने हरकत नोंदवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com