esakal | कालव्यात बुडून बालकाचा मृत्यू: अथणी तालुक्यातील घटना ; Belguam News
sakal

बोलून बातमी शोधा

कालव्यात बुडून ६ वर्षीय बालकाचा मृत्यू:  अथणी तालुक्यातील घटना

कालव्यात बुडून बालकाचा मृत्यू: अथणी तालुक्यातील घटना

sakal_logo
By
एम. ए. रोहिले

रायबाग : अथणी तालुक्यात कोहळ्ळी येथे कालव्यात बुडून बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कंकणवाडी (ता. रायबाग) येथे कालव्यात बुडाल्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. राहुल पद्माण्णा पुजारी (वय ६) असे मयत बालकाचे नाव आहे. भावासोबत खेळताना काळाने त्याच्यावर झडप घातली. रविवारी (ता. १०) सायंकाळी ही घटना घडली. रायबाग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

राहुल पुजारी हा रविवारी (ता. १०) भावासोबत खेळताना चेंडू अचानकपणे कालव्यात पडला. तो आणण्यासाठी गेला असता राहुल कालव्यात बुडाला. त्याची माहिती भावाने येऊन दिल्यावर कुटुंबीय व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले.

हेही वाचा: 'बुडा' बैठक तिसऱ्यांदा रद्द; अध्यक्ष होसमनी, आमदार आक्रमक

काल सायंकाळपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. आज (ता. ११) सकाळी 11 वाजता राहुलचा मृतदेह बस्तवाड येथे आढळला. रायबाग पोलिसांनी पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी उपस्थितांसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. राहुल याच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.या प्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

loading image
go to top