esakal | रायबाग पोटनिवडणूक: सासूच्या जागेवर सूनेची बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

रायबाग पोटनिवडणूक: सासूच्या जागेवर सूनेची बाजी

रायबाग पोटनिवडणूक: सासूच्या जागेवर सूनेची बाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायबाग (बेळगाव) : येथील नगर पंचायतीच्या प्रभाग ९ मधील पोटनिवडणुकीत सरस्वती रवि तराळ या विजयी झाल्या. तहसीलदार कार्यालयात आज (ता. ६) मतमोजणी झाली. कमला महादेव तराळ यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक लागली होती. त्यात सासूच्या जागेवर सरस्वती तराळ यांच्या रूपाने सूनेने बाजी मारली आहे.

रायबाग नगर पंचायतीमधील प्रभाग ९ मधील पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. ३) मतदान झाले. त्यात मयत नगरसेविका कमला महादेव तराळ यांच्या सूनबाई सरस्वती रवि तराळ या विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांच्या गटातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. एकुण तीन उमेदवार मैदानात होत्या.

हेही वाचा: कॅबिनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू: राजू शेट्टी

प्रभागात ५८५ पैकी ४३१ मतदान झाले होते. त्यात सरस्वती तराळ यांना २८९, भाजपच्या उमेदवार लक्ष्मी कोळी यांना ६९ तर काॅग्रेसच्या उमेदवार सावित्री कोळी यांना ७१ मते मिळाली. विजयानंतर सरस्वती तराळ यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.

loading image
go to top