
जिल्ह्यात दारू, मटक्यावर छापासत्र
सांगली - जिल्ह्यात सध्या यात्रा-जत्रा आणि उरूस सुरू असून दुसरीकडे बेकायदा दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी या पार्श्र्वभूमीवर बेकायदा दारू व मटका अड्ड्यांवर छापे मारले आहेत. चार दिवसांत ५६ हजार २५५ रुपयांचा दारूसाठा जप्त केला. तसेच मटक्यावरील छाप्यात २ लाख १३ हजार ९७० रुपयांचा माल जप्त केला. पोलिसांकडून तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या छापासत्रामुळे हातभट्टीची दारू तयार करण्याचे प्रमाण घटले आहे. हातभट्टीचे प्रमाण कमी झाले असले, तरी दुसरीकडे देशी दारूची बेकायदा विक्री वाढली आहे. गावागावामध्ये अनेकजण देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करत आहेत. कोठेही आडोशाला दारूसाठा ठेवून त्याची विक्री केली जाते.
चार दिवसांत पोलिसांनी बेकायदा दारू विक्रीचे ४५ गुन्हे दाखल केले. या छाप्यात ५६ हजार २५५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मटका अड्ड्यांवर देखील छापे मारले आहेत. मटकाप्रकरणी ४४ गुन्हे करून ४७ जणांवर कारवाई केली. तसेच २ लाख १३ हार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सुचनेनुसार पोलिस ठाण्यांनी ही कारवाई केली आहे. बेकायदा दारू विक्रीबद्दल पोलिस दलाकडून अधिक केसेस केल्या जात आहेत. परंतु ज्या विभागाची जबाबदारी आहे, त्या उत्पादन शुल्ककडून कारवाईचे प्रमाण कमी आहे.
Web Title: Raid On Alcohol And Gambling In Sangli District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..