दहावी नापास असलेल्या तोतया डॉक्टरवर छापा; दवाखाना केला सील

दहावी नापास असून देखील रुग्णांवर आलोपथी आणि होमिओपॅथी उपचार करणाऱ्या एका तोतया डॉक्टरावर छापा टाकून आरोग्य खात्याने कारवाई केली.
Bogus Doctor Arrested
Bogus Doctor ArrestedSakal

बेळगाव - दहावी नापास असून देखील रुग्णांवर आलोपथी आणि होमिओपॅथी उपचार करणाऱ्या एका तोतया डॉक्टरावर छापा टाकून आरोग्य खात्याने कारवाई केली आहे. गुरुवार (ता.७) गांधीनगर येथे ही कारवाई करून दवाखाना सील करण्यात आला आहे. आरोग्य खात्याच्या या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या क्लिनिक चालविणाऱ्या तोतया डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

अडीव्याप्पा आडीनावर असे संबंधित तोतया डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याविरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. गांधीनगर येथे गेल्या सात महिन्यापासून समृद्धी क्लिनिक नावाने दवाखाना सुरू करण्यात आला होता. बाहेरील फलकावर डॉ. बेल्लद (एमबीबीएस एमडी) आणि डॉ. शंकर (बीएचएमएस) अशी नावे असलेला फलक लावण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात दहावी नापास झालेला आडीव्याप्पा हा अप्रोन घालून आपणच डॉक्टर असल्याचे सांगत रुग्णावर उपचार करत होता. त्यामुळे तोतया डॉक्टबद्द्ल संशय आल्याने काहींनी याबाबत आरोग्य खात्याकडे तक्रार दाखल केली होती.

Bogus Doctor Arrested
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ!

त्यानुसार आज नोडल अधिकारी डॉ. एम.व्ही. किड्सण्णावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, आरोग्य अधिकारी मंजुनाथ बिसनहल्ली, विभागीय कार्यक्रम अधिकारी शँकर देसाई यांनी अचानक छापा टाकला. त्यावेळी त्याठिकाणी आडीव्याप्पा आढळून आला. त्याची अधिकाऱ्यांनी कसून विचारपूस केली असता त्याच्याकडे वैधकीय क्षेत्राची कोणत्याही प्रकारची पदवी नसल्याचे समोर आले. तसेच तो दहावी नापास असल्याचे समोर आल्याने अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. तो उपचारासाठी येणाऱ्या रुग्णावर आलोपथी व होमिओपॅथी अशा सर्व प्रकारचे उपचार करत होता. त्याच्या दवाखान्यात आढळून आलेला औषधसाठा देखील यावेळी जप्त करण्यात आला. गांधीनगर येथे अनधिकृतरित्या सुरू करण्यात आलेला तो दवाखाना देखील सील करण्यात आला.

गांधीनगर येथील समृद्धी दवाखाच्या फलकावर डॉ. बेल्लद आणि डॉ. शंकर अशी नावे लिहून त्यापुढे त्यांची पदवी लिहिण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांना अधिकाऱ्यांनी संपर्क साधून विचारणा केली असता याबाबत आपणाला कोणतीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगीलते. डॉ. बेल्लद हे केएलइ रुग्णालयात कार्यरत आहेत.

आडीव्याप्पा हा यापूर्वी एका दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करत होता. डॉक्टरांच्या हाताखाली काम करता करता त्याने रुग्णावर करण्यात येणारी उपचार पद्धती शिकून घेतली होती. त्यानंतर त्याला डॉक्टर बनण्याची इच्छा झाली आणि तो डॉक्टर बनला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com