रायगड किल्ल्यावर शिवचरणी नतमस्तक होऊन शिवभक्त नवदांपत्यांनी केला सहजीवनाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

बेळगाव जिल्ह्यातील सामरा या गावातील सागर आणि मधुरा व त्यांचा मित्र हर्षदा आणि अभिषेक या दोन जोडप्यांनी ही अनोख्या पद्धतीने हा मार्ग स्वीकारला.उच्च शिक्षण घेऊन आय टी क्षेत्रात काम करणार्‍या या दांपत्यानी केलेले अनुकरण आजच्या नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.

बेळगाव:  लग्न झाल्यावर अनेक नवदांपत्य हनिमूनसाठी वेगवेगळी डेस्टिनेशन शोधतात.काहीना थंड हवेच्या ठिकाणी जायचं असतं तर काहींना निसर्गरम्य ठिकाणी तर काहींना समुद्र सपाटी चा आनंद घ्यायचा असतो मात्र बेळगाव जिल्ह्यातील विवाहित नवदाम्पत्यांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात करण्यासाठी  वेगळा फंडा अजमवला आहे.बेळगाव जिल्ह्यातील सामरा या गावातील सागर आणि मधुरा व त्यांचा मित्र हर्षदा आणि अभिषेक या दोन जोडप्यांनी ही अनोख्या पद्धतीने हा मार्ग स्वीकारला.उच्च शिक्षण घेऊन आय टी क्षेत्रात काम करणार्‍या या दांपत्यानी केलेले अनुकरण आजच्या नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या रायगडच्या किल्ल्यावर त्या दोन नवविवाहित दांपत्याचे  आगमन झाले. प्रेरणा स्तोत्रमुळे परिसर दुमूदुमून गेला आणि या ठिकाणी  उपस्थित सर्व भाविक  भारावून गेले. या दोन नवदांपत्यांना आपल्या नवजीवनाची सुरुवात प्रेक्षणीय स्थळ अथवा हनिमून च्या ठिकाणी न जाता शिव छत्रपतींच्या चरणी शपथ घेतली आणि आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली.

बेळगाव जिल्ह्यातील सामरा या गावातील सागर आणि मधुरा व त्यांचा मित्र हर्षदा आणि अभिषेक या गावातील दोन जोडप्यांनी ही अनोख्या पद्धतीने हा मार्ग स्वीकारला.उच्च शिक्षण घेऊन आय टी क्षेत्रात काम करणार्‍या या दांपत्यानी केलेले अनुकरण आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.

सागर आणि माधुरी हे दोघेही पुणे येथील टाटा कन्सल्टींग सर्विस मध्ये नोकरी करतात. आय टी क्षेत्रात चांगल्या पदावर काम करीत असतानाही त्यांनी आपल्या संस्कृतीचा ठेवा जपण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे डिसेंबर मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर हनिमूनसाठी पर्यटनस्थळी न जाता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीला भेट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नवीन लग्न झालेले त्यांचे मित्र हर्षदा आणि अभिषेक हे यामध्ये सहभागी झाले.
 ठरल्यानुसार हे दोन्ही दांपत्य रायगड या ठिकाणी पोहोचले. 

हेही वाचा- शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असलेले लोक मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या या आंदोलनात उतरले

पायात चप्पल न घालता अनवाणी सर्व पायर्‍या चढत रायगडावर जाऊन त्यांनी शिवछत्रपती  महाराजांचे दर्शन घेतले. याचवेळी उपस्थितांनी प्रेरणास्तोत्र च्या स्तुतीने परिसर दुमदुमून सोडला. दोन्ही दाम्पत्यांच्या या अनोख्या जीवन प्रवासाची सुरुवात एका वेगळ्या आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडले.शिक्षित दांपत्यानी हा मार्ग स्विकारत नवी  पिढी आजही संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करते याची साक्ष दिली.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad fort and Shivaji maharaj devotees newlyweds start married life belgaum marathi news