esakal | मिरज जंक्‍शनमध्ये रेल्वेचे उत्पन्न एक कोटीने घटले; 35 गाड्या कमी; फुकट्यांना 22 लाखांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

 Railway revenue at Miraj junction fell by Rs one crore; 35 trains less; Freebies fined Rs 22 lakh

रेल्वेच्या मिरज जंक्‍शनमधून जाणाऱ्या एकूण 65 पैकी केवळ 37 गाड्या सुरू झाल्या असून, अद्याप 35 गाड्या बंद आहेत.

मिरज जंक्‍शनमध्ये रेल्वेचे उत्पन्न एक कोटीने घटले; 35 गाड्या कमी; फुकट्यांना 22 लाखांचा दंड

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज ः कोरोना संकटानंतर मधल्या काळात बहुतांश व्यवहार पूर्वपदावर आले होते, मात्र रेल्वे अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. रेल्वेच्या मिरज जंक्‍शनमधून जाणाऱ्या एकूण 65 पैकी केवळ 37 गाड्या सुरू झाल्या असून, अद्याप 35 गाड्या बंद आहेत. यामुळे मिरजेतील काऊंटरचे दर महिन्याचे उत्पन्न सुमारे एक कोटी रुपयांनी घटले आहे. या काळात फुकट्या प्रवाशांची संख्या मात्र कमी झालेली नाही. त्यांना तब्बल 22 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. 


कोरोना संकटाला एक वर्ष पूर्ण झाले. मागील 22 मार्च रोजी सांगली जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला होता. याचदिवशी देशात लॉकडाऊन झाले आणि सर्व ठप्प झाले. रेल्वेला मोठा फटका बसला. आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली. लोक जागेवर थांबले. बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील औद्योगिक कामगार आणि बांधकाम मजुरांसह हंगामापुरते येणारे बेदाणा निर्मिती कामगार अडकून पडले होते. 


मे महिन्यात काही कामगारांसाठी गाड्या सोडण्यात आल्या, मात्र रेल्वे पूर्ण सुरू व्हायला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी जावा लागला. त्यानंतरही ती अद्याप पूर्ण रुळावर आलेली नाही. मुंबईत लोकल सुरू झाल्या, कर्नाटकात स्थानिक पॅसेंजर सुरू झाल्या, मात्र इथे अद्याप अडचणी असल्याने आणि पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्या सुरू होतील की नाही, याबाबत अनिश्‍चितता आहे. 


मिरज जंक्‍शनमध्ये महिन्याकाठी तीन कोटींचे उत्पन्न होते. ते आता दोन कोटींवर आले आहे. दरम्यान, फुकट्या प्रवाशांनकडून 22 लाख इतकी मोठी दंडात्मक कारवाई, तिकीट तपासणीसांकडून करण्यात आली. यामध्ये नावात फेरफार करून प्रवास करणे, विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफार्म तिकीट आदींचा समावेश आहे. 
 

दहां महिन्यातील उत्पन्न 

महिना प्रवासी संख्या उत्पन्न (रु.) *दंडात्मक कारवाई दंडात्मक रक्कम (रु.) 
मे 20 3351 34,63,000 नाही नाही 
जून 20 8325 78,00,883 नाही  नाही 
जुलै 20 7489 72,21,000  नाही  नाही 
ऑगस्ट 20 9554 84,41,000 *5 *4300  5 4300 
सप्टेंबर 20 13601 99, 90,000 140 89000 
ऑक्‍टोबर 20 24348 1,62,00,000 289 1, 89,000 
​नोव्हेंबर 20 36151 1,95,00,000 600 4,10,000
डिसेंबर 20 42389 1,87,00,000 400 2,40,000 
जानेवारी 21 48983 2,25,00,000 1400 7,50,000 
फेब्रुवारी 21 55073 2,10,00,000 900 5,50,000

सध्या बंद असलेल्या रेल्वे 

पॅसेंजर 

 •  मिरज-बेळगाव 
 •  मिरज-लोंढा 
 •  मिरज-हुबळी 
 •  मिरज-कॅसरलॉक 
 •  मिरज-पंढरपूर 
 •  मिरज-परळी 
 •  मिरज-कुर्डूवाडी 
 •  मिरज-सातारा 
 •  मिरज-कोल्हापूर 
 • एक्‍स्प्रेस गाड्या 

लिंक एक्‍सप्रेस 

 •  सह्याद्री एक्‍सप्रेस 
 •  कोल्हापूर- सोलापूर 
 •  कोल्हापूर- मनडुगनूर 
 •  मिरज- पंढरपूर 
 •  मिरज- सोलापूर 
 •  मिरज हुबळी लिंक 

संपादन : युवराज यादव 

loading image