भरावाचे काम पुर्ण; मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत

शंकर भोसले 
Saturday, 24 October 2020

मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील येरळा नदीवरील रेल्वे भरावाचे काम पुर्ण झाल्याने आठवडाभर बंद असलेल्या कोल्हापूर-मुंबई गाडी (01030), कोल्हापूर - गोंदिया गाडी (01039), हुबळी-लोकमान्य गाडी (07317) लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबळी ऐक्‍स्प्रेस (07318) विशेष गाड्या आज (ता. 23) पासून सुरू करण्यात आल्या आहेत.

मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील येरळा नदीवरील रेल्वे भरावाचे काम पुर्ण झाल्याने आठवडाभर बंद असलेल्या कोल्हापूर-मुंबई गाडी (01030), कोल्हापूर - गोंदिया गाडी (01039), हुबळी-लोकमान्य गाडी (07317) लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबळी ऐक्‍स्प्रेस (07318) विशेष गाड्या आज (ता. 23) पासून सुरू करण्यात आल्या आहेत. कुर्डुवाडी पंढरपूरमार्गे धावणा-या निजामुद्दीन-वास्को-हजरत गोवा आणि यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन या विशेष गाड्या मिरज, पुणेमार्गे नियमित पणे धावतील. 

परतीच्या पावसाने आठवडाभर धुमाकूळ घातल्याने मिरज-पुणे मार्गावरील भिलवडी-नांद्रे येथील येरळा नदीवरील पुलाचा भराव पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून गेला. त्यामुळे गोंदिया, कोयना, हुबळी गाड्या आठवडाभरासाठी रद्द केल्या होत्या. तर निजामुद्दीन गोवा, यशवंतपुर-संपर्क क्रांती या गाड्या कुर्डुवाडी मार्गे सोडण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या युध्द पातळीवरील दुरूस्ती कामामुळे आजपासून (ता.23) पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आल्या. 

वेळेत बदल... 
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी लोकमान्य टिळक हुबळी एक्‍स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनंस या स्थानकातून सायंकाळी 6 वाजून 45 मिनीटांएवजी रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि हुबळी स्थानकात दुस-या दिवशी 11 वाजता पोहचेल. पुढील स्थानकांवरील पुणे स्थानकात रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी येईल. कराड पहाटे 4 वाजून 3 मिनिटांनी येईल, सांगली पहाटे 5 वाजून 23 मिनिटे तर मिरज स्थानकात 5 वाजून 55 मिनिटांनी येईल.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway service on Miraj-Pune route resumed