बेळगावमध्‍ये नव्या मार्गावरून धावताहेत रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

torisum railway

बेळगावमध्‍ये नव्या मार्गावरून धावताहेत रेल्वे

बेळगाव: बेळगाव ते देसूर (१०.८७ किमी) दरम्यान रेल्‍वे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वेमार्गाची चार दिवसांपूर्वी स्पेशल ट्रेनद्वारे चाचणी घेण्यात आली. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या नव्या मार्गावर रेल्वे धावत आहेत. देसूर ते लोंढा दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून हे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.

मिरज ते लोंढापर्यंतच्या दुपदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बेळगाव शहर व आसपास दुपदरीकरणाची कामेही प्रगतीपथावर आहेत. पहिल्या टप्प्यात बेळगाव रेल्वेस्थानक ते तिसऱ्या रेल्वेफाटकापर्यंत काम पूर्ण करुन या नव्या रेल्वेमार्गावरुन रेल्वे धावली होती. मात्र, आता बेळगाव ते देसूर या १० किलोमीटरच्या नव्या मार्गावरून रेल्वे धावत आहे. यामुळे देसूर ते लोंढापर्यंतच्या कामालाही गती दिली आहे.

चार दिवसांपूर्वी बेळगाव ते देसूर या मार्गाची नैर्ऋत्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त अभयकुमार राय यांनी स्पेशल रेल्वेद्वारे जलद चाचणी घेतली होती. ताशी १२० किलोमीटर वेगाने नव्याने तयार करण्यात आलेल्या दुपदरी रेल्वेमार्गावरून ही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रेल्वे धावण्यास व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतरच त्यावरून रेल्वे धावली.

बेळगाव ते देसूर दरम्यानचे नव्या ट्रॅकची काम पूर्ण झाले आहे. यामुळे बुधवारी याची पाहणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून यावरून रेल्वे धावत आहेत. देसूर ते लोंढापर्यंतचे कामही प्रगतीपथावर आहे.

अनिश हेगडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैऋत्य रेल्वे

Web Title: Railways Running New Routes Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top