सातारा - तळमावले परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

जयभीम कांबळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

तळमावले (सातारा) : ऐन कडक उन्हाळा आता जोर धरत असताना उन्हाच्या तडक्याने व गर्मी ने लोक बहाल झाली होती. आज अचानक आज दुपारी साडेतीन पासून  येथील परिसरात आज पावसाने आगमन केले. सुसाट वाऱ्यासह अर्धा तास धुवादार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मात्र तारांबळ उडाली. पावसामुळे येथील परिसरातील काही सखल भागात पाणी साचले होते. पावसाच्या आगमनाने काही काळ येथील वाहतूकीचा वेग मंदावला.       

आज दुपार पासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यामुळे येथील जनजीवन काही वेळ विस्कळीत झाले होते. कडक उन्हात अंगाची लाही लाही होत असताना आलेल्या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. याच पावसात भिजण्याचा आनंद येथील काही युवकांनी घेतला.

Web Title: rain in talmawale satara