इथल्या बेदाण्याला मिळाला उच्चांकी दर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये यावर्षीच्या नव्या हिरव्या बेदाण्याला 230 रुपये किलो असा उच्चानकी दर मिळाला. यावर्षीचा हा सर्वाधिक दर आहे.

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये यावर्षीच्या नव्या हिरव्या बेदाण्याला 230 रुपये किलो असा उच्चानकी दर मिळाला. यावर्षीचा हा सर्वाधिक दर आहे. आज बाजारात 1 हजार टन बेदाण्याची आवक झाली.

आज झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये सतीश ट्रेडिंग कंपनी सतीश माळी यांच्या अडत दुकानात शेतकरी शिवानंद भीमाण्णा (हुन्नुर रा. बिजरगी. जि. विजापूर) यांच्या नवीन हिरव्या बेदाण्यास 

87 बॉक्‍स बेदाण्याला 230 दर मिळाला. रोहिणी ट्रेडिंग कंपनीच्या मुन्ना मुंदडा यानी खरेदी केला. आज बाजार आवारात सौद्यासाठी 70,350 बॉक्‍सची (105 गाडी) आवक होऊन प्रत्येक्ष विक्री 48,280 (72 गाडी) विक्री झाली आहे. नवीन बेदाण्यास उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. 

आजच्या सौद्यात हिरवा बेदाणा 125 ते 230 रु. किलो, पिवळा बेदाणा 120 ते 220 काळा बेदाणा रु. 40 ते 90 असे दर मिळाले आहेत. सौद्यास बाजार समितीचे सभापती अजित नारायण जाधव, धनाजी पाटील, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील, विवेक 
शेंडगे. कुमार शेटे व्यापारी असोसिएशन उपअध्यक्ष संजय बोथरा, मनोज मालू, विनित बाफना, केतन सुचक, राहुल बाफना, एम. जे. पटेल, रितेश मज्जेठय्या, पनू सारडा, 
मुकेशभई पटेल, किरण बोडके, नितीन मर्दा, योगेश कबाडे व बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी बाजार आवारातील सर्व खरेदीदार व्यापारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

तासगाव बेदाणा बाजारपेठेत यावर्षीच्या नव्या बेदाण्याची मोठी आवक सुरू असून सुरवातीपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. यावर्षी द्राक्षाचे उत्पादन घटले असल्याने बेदाणा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने बेदाणा उत्पादक खुशीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raisin got highest rate in Tasgao market