
सांगली : चालू हंगामातील हळदीला चांगला भाव मिळत आहे. राजापुरी हळदीला आज झालेल्या सौद्यात विक्रमी प्रति क्विंटलला पंचवीस हजार रुपये दर मिळाला. चोरा हळदीचे भावही वाढत असून, सौद्यात क्विंटलला २८ हजार दर मिळाला. दरम्यान, वसंतदादा मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले.