Sangli News : 'राजारामबापू'वरील ठिय्या आंदोलनप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

राजू शेट्टी यांच्यासह २० प्रमुख कार्यकर्ते व अन्य १५० लोकांचा जमाव यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
rajarambapu sugar factory protest raju shetti and swabhimani activist filed case sangli
rajarambapu sugar factory protest raju shetti and swabhimani activist filed case sangliSakal

Sangli News: जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी तसेच १० तासांसाठी राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे गाळप बंद ठेवून कारखाना,

ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार यांचे नुकसान केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह २० प्रमुख कार्यकर्ते व अन्य १५० लोकांचा जमाव यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप महादेव पाटील (वय ५८, रा. राजारामबापू साखर कारखाना कामगार कॉलनी, राजारामनगर) यांनी याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.शुक्रवारी (ता. १) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसदराच्या निर्णयासाठी आंदोलन केले होते.

राजू शेट्टी यांच्यासह भागवत शिवाजीराव जाधव (रा. नवेखेड) महेश खराडे (तासगाव), संदीप राजोबा (ब्रह्मनाळ ता. पलूस), शमसुद्दीन संदे (इस्लामपूर), रविकिरण माने व संतोष शेळके (दोघेही रा. तांबवे) राजेंद्र माने (शिवणी, ता. कऱ्हाड), स्वस्तिक पाटील (शिरोळ, जिल्हा कोल्हापूर), सूर्यकांत मोरे (पलूस),

rajarambapu sugar factory protest raju shetti and swabhimani activist filed case sangli
Sangli News : 'अवकाळी'च्या तडाख्याने द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शाळू भुईसपाट; सांगलीत हजारो एकर क्षेत्र बाधित

काशिनाथ निंबाळकर (कामेरी), प्रभाकर पाटील (रेठरे धरण), संजय बेले (समडोळी), आप्पासो पाटील (इस्लामपूर) जगन्नाथ भोसले (बावची), बाबासो सांद्रे (दुधगाव ता. मिरज), शिवाजी पाटील (इस्लामपूर), राम पाटील (शिराळा),

अनिल काळे (इस्लामपूर), रवींद्र दुकाने (वाटेगाव) असे गुन्हा दाखल झालेले प्रमुख कार्यकर्ते आहेत. या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य १२५ ते १५० लोकांचा जमाव त्यांच्यासोबत होता असेही फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शुक्रवारी (ता. १) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुपारी १२ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील बाजूच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन केले.

यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत ठिय्या आंदोलन केले. कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत कारखान्याचे गाळप बंद ठेवावे लागले होते.

त्यामुळे या काळात कारखान्याचे तसेच ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूकदार यांचे नुकसान झाले. साखर कारखान्याचे साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन या विभागाचेही लाखो रुपयांचे नुकसान झालेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com