esakal | राजस्थानच्या द्राक्ष दलालाकडून 33 लाखांचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

 Rajasthan's grape broker cheated for Rs 33 lakh to Sangali farmers

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना राजस्थान येथील द्राक्ष दलाल लक्ष्मी नारायण परमार (रा. खेमरी ता. बखेडी) यांने 33 लाख रुपयेला गंडा घातला आहे. तो फरारी झाला आहे.

राजस्थानच्या द्राक्ष दलालाकडून 33 लाखांचा गंडा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिरढोण ः कवठेमहांकाळ तालुक्‍यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना राजस्थान येथील द्राक्ष दलाल लक्ष्मी नारायण परमार (रा. खेमरी ता. बखेडी) यांने 33 लाख रुपयेला गंडा घातला आहे. तो फरारी झाला आहे. याच्या विरुद्ध कवठेमहांकाळ पोलिसांत 16 शेतकऱ्यांना फसवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद सुरेश पवार (रा. कुंडलापूर ता. कवठेमहांकाळ) यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत दिली आहे. 

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्‍यासह द्राक्ष दलालाने विश्‍वास संपादन करून द्राक्षे खरेदी केली. तसेच शेतकऱ्यांची होणारी रक्कम दिली. नतर काही दिवासांनी द्राक्ष बागेत जाऊन एजंटमार्फत द्राक्षे खरेदी केली.

यामध्ये राजेंद्र बाबर (रा. जाखापूर (तीन लाख अठरा हजार चारशे वीस), सुखदेव माळी (रा. जाखापूर ता. कवठेमहांकाळ) (दोन लाख 30 हजार), अनिल माळी रा.जाखापूर (एक लाख 71 हजार), पंकज वाघमोडेर गज्रेवाडी (दहा हजार सत्त्याहत्तर हजार) लक्ष्मण माळी रा. मळणगाव (70 हजार आठशे), सदाशिव गायकवाड रा. मळणगाव (दोन लाख 35 हजार), धनंजय शिंदे रा. कुची (एक लाख 26 हजार),राजेद्र पाटील रा.बोरगांव ता. कवठेमहांकाळ (एक लाख 47 हजार, सुभास पाटील रा. जायगव्हाण चार लाख 57 हजार), अशोक पवार शिपूर ता. मिरज (एक लाख 95 हजार, सर्जेराव बाबर रा. शिपूर ता. मिरज (दोन लाख 68 हजार), अजित पाटील रा. म्हैसाळ करोली ता. कवठेमहांकाळ (तीन लाख 62 हजार ), सुभाष पाटील रा. म्हैसाळ करोली (दोन लाख 40 हजार), केशव पवार रा. लोकरेवाडी ता. तासगाव (83 हजार), प्रसाद पाटील आगळगाव (एक लाख 56 हजार) अशी एकूण (33, 82,860) रुपये द्राक्ष माल घेऊन द्राक्ष दलाल लक्ष्मी नारायण परमार रा. खेमरी ता. बखेडी जगडावर गोलपूर (राजस्थान) या दलालाने शेतकऱ्यांना गंडा घालून फरारी झाला आहे. 

या दलाला वारंवार फोन करून देखील मोबाईल उचलत नाही तसेच मोबाईल बंद ठेवणे असे प्रकार झाले आहेत. अखेर कवठेमहांकाळ व मिरज येथील शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर यासर्व शेतकऱ्यांनी दलाल लक्ष्मी परमार याच्या विरुद्ध फसवणूकची फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या विरुद्ध कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.