गुढीपाडव्याला होणारी राजगड गावातील गाड्याची आणि किल्ल्यावरील यात्रा रद्द...

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 23 March 2020

या वर्षी होणारी राजगड गावातील गाड्या ची यात्रा व किल्ल्यावरील यात्रा रद्द करण्यात आल्याचे पत्रक श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व राजगड किल्ल्यावरील यात्रा कमिटीच्या वतीने कळविण्यात आले

 बेळगाव  : श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व यात्रा कमिटी राजहंसगड यांच्यावतीने जाहीर खुलासा. राजहंसगड ता. जि. बेळगाव येथील प्रसिद्ध व वडिलोपार्जित काळापासून अखंडितपणे सुरू असलेल्या चैत्र गुढीपाडवा दरवर्षी दोन दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. व यावेळीही 25 व 26 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा व गावची गाड्यांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी राजगड यात्रा कमिटीने मोठी जय्यत तयारी सुरू केली होती.

हेही वाचा- Photo : ओपीडी बंद केल्याने रुग्णांची झाली घालमेल...

सरकारच्या आदेशाचे पालन​

पण संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना सारख्या रोगावर मात करण्यासाठी व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून व सर्व जनतेच्या व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या आदेशाचे पालन करत या वर्षी होणारी राजगड गावातील गाड्या ची यात्रा व किल्ल्यावरील यात्रा रद्द करण्यात आल्याचे पत्रक श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व राजगड किल्ल्यावरील यात्रा कमिटीच्या वतीने कळविण्यात आले असून परिसरातील जनतेने व गावातील जनतेने व भाविकांनी या आदेशाचे पालन करून सहकार्य करणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे कोणीही किल्ल्यावरती अथवा गावांमध्ये यात्रेच्या निमित्ताने येऊ नये असे कळविण्यात आले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajgad village and fort festival canceled belgaum marathi news