esakal | एकरकमी FRP साठी सरकारला गुढघे टेकायला लावू; शेट्टींचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

एकरकमी FRP साठी सरकारला गुढघे टेकायला लावू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सागंली : केंद्र सरकारने एफआरपी FRP तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्यसरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ असं म्हणत आहे. परंतु आम्ही मात्र एकरकमी एफआरपी वर आम्ही ठाम आहोत. ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचा भूमिका घेत आहेत. मात्र आम्ही यांना गुडघे टेकायला लावू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. सांगली येथे ते बोलत होते.

ते म्हणाले, दोन महिने झाले तरी अजूनही पूरग्रस्तांना सरकारने मदत दिलेली नाही. आता केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. राज्य सरकारची अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचलेली नाही. यासाठी जलसमाधी आंदोलनही केले आहे. आता केंद्र सरकारचे पथक येऊन काय पाहणार आहे, असा सवालाही त्यांनी केला आहे. या सर्व गोष्टीवरून केंद्र सरकारला शेतकऱ्यांविषयी किती तळमळ हे दिसते असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही, तर महाविकास आघाडीतील नेत्यांची दिवाळी गोड लागू देणार नाही असा इशाराही शेट्टींनी दिला आहे.

loading image
go to top