
भिलवडी : ‘‘केंद्र सरकार आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत बघ्याची भूमिका घेत आहे. नदीचा प्रवाह, उतार लक्षात घेता नदीकाठची शेती उद्ध्वस्त होईल,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथे संग्रामदादा स्मृती सेवा गौरव पुरस्कार शेट्टी यांना खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फेटा, मानपत्र व ११ हजार रुपये असे स्वरूप आहे.