Sangli Loksabha : 'स्वाभिमानी' लोकसभा लढल्यास फटका कुणाला? राजू शेट्टींची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatanaesakal
Summary

राजू शेट्टी यांनी आपल्यासोबत यावे, यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून प्रयत्न सुरु आहेत.

सांगली : गत लोकसभा निवडणुकीत (Sangli Loksabha Election) महाविकास आघाडीकडून सांगली मतदार संघ ऐनवेळी पदरात पडल्यानंतर ताकदीने लढलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना या वेळी पुन्हा मैदानात उतरणार का, हा उत्सुकतेचा विषय आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना ‘सांगली’तील हालचालींचा ‘हातकणंगले’वर होणारा परिणाम चिंता वाढवणारा आहे.

त्यामुळे सांगली मतदार संघातून प्रतिसाद असेल तरच ते इथे विचार करतील, अशी शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सन २०१९ ला स्वाभिमानीकडून विशाल पाटील लढले होते. त्यांची यंत्रणा मोठी आहे, प्रत्येक तालुक्यात गट आहे. त्यात स्वाभिमानीची उमेदवारी मिळाल्याने काही सामाजिक परिणामांचा लाभ झाला आणि विशाल यांना ३ लाख ३० हजारांवर मते मिळाली.

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
प्रतीक पाटील लोकसभा लढविणार? जयंत पाटलांनी राजू शेट्टींबाबत व्यक्त केली भीती; म्हणाले, प्रतीक यांना उतरवण्याचा..

ही ‘स्वाभिमानी’ची मते आहेत, असा दावा करून यावेळी शड्डू ठोकता येणार नाही, याची जाणीव राजू शेट्टी यांना आहे. केवळ लढायचे म्हणून लांग बांधून तयार राहून चालणार नाही, याची जाणीव त्यांना गेल्या निवडणुकीत झाली. त्यामुळे यावेळी ते अधिक सावध आहेत. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी गेल्या काही काळात ऊस, बेदाणा, द्राक्ष आदी प्रश्‍नांवर मतदार संघात चांगला संपर्क ठेवला आहे. स्वाभिमानीचा गट बांधला आहे. तरुण शेतकऱ्यांची टीम त्यांच्याकडे आहे. त्यामुळे लढण्याची इच्छा आणि तयारी असल्याचे ते सांगतात.

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Sangli Loksabha : कोयनेच्या पाण्यावरून होणार रणकंदन; लोकसभेच्या फडात पाण्याचं राजकारण पेटणार, नेते आक्रमक

महेश खराडे उमेदवार असतील तर काय, याचे गणित सध्या तरी मोठे पक्ष घालताना दिसत नाही. भाजपकडून खासदार संजय पाटील पुन्हा उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस की शिवेसना (ठाकरे) याचा फैसला व्हायचा बाकी आहे. एकूणच, आघाडी आणि युतीचे त्रांगडे सुटल्यानंतरच राजू शेट्टी सहा जागांबाबत आपले धोरण ठरवतील, असे संकेत मिळत आहेत. त्यात ‘सांगली’ लढायची की सोडायची, याचा फैसला ते करतील.

Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Satara Loksabha : CM शिंदेंचे समर्थक पुरुषोत्तम जाधवांनी वाढवलं उदयनराजेंचं टेन्शन; लोकसभेसाठी मागितली उमेदवारी

राजू शेट्टी यांनी आपल्यासोबत यावे, यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी तुर्त त्यास नकार दिला आहे. तो होकारात बदलला तर अनेक ठिकाणी स्वाभिमानी वेगळा निर्णय घेऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com