राज्यसभा निवडणूकीत धनंजय महाडीकांच्या विजयाचा आनंद

राजू शेट्टी यांनी महाडकांचा कऱ्हाडला केला सत्कार; भाजपसहीत महाविकास आघाडीपासून स्वाभीमानी दूर असल्याचेही सुतोवाच
Raju Shetty felicitates Dhananjay Mahadik.
Raju Shetty felicitates Dhananjay Mahadik.Sakal
Updated on

कऱ्हाड - राज्यसभा निवडणुकीत जवळचा अन् जिल्ह्यातील खासदार धनंजय महाडीक निवडून आल्याने त्यांचा कोल्हापूरकर म्हणून आनंद झाला आहे, अशा भावना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खसदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारून खासदार महाडीक बाहेर जात असतानाच माजी खासदार शेट्टी तेथे आले. त्यावेळी खासदार महाडीक यांनी वाहन थांबवून त्यांचे आर्शिवाद घेतले. त्यावेळी शेट्टी यांनी त्यांना मिठी मारून व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित खासदार महाडिक येथे आले होते. त्यावेळी त्यांची व माजी खासदार शेट्टी यांची योगायोगाने भेट झाली. त्यावेळी दोघांनी एखमेकांना अलींगन देवून विचारपूस केली. बस्स करून दाखवल, असे म्हणत श्री. शेट्टी यांनी श्री. महाडीक यांचे अभिनंदनही केले. माजी खासदार शेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्या जिल्ह्याील उमेदवार निवडून आल्याने आनंद झाल्याचे भावना शेट्टी यांनी व्यक्त केल्या. श्री. शेट्टी म्हणाले,राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातील उमेदवार निवडून आल्याने आनंद आहे. धनंजय आमचे मित्र आहेत. आम्ही भाजप आणि माणूस महाविकास आघाडीपासून लांब आहोत, स्वतंत्र आहोत. त्यामुळे एका मित्राचा विजय झाल्याने आनंद होतो आहे.

श्री. शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना यापूर्वीच बाहेर पडली आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीत आमचा थेट सहभाग नव्हता. देवेंद्र भुयारने मत दिलं किंवा नाही दिलं याच्याशी आम्हाला घेणे- देणे नाही. तेव्हा स्वाभिमानीचा उल्लेख संजय राऊत यांनी केला यांच्यावर मला आक्षेप आहे. आमदार देवेंद्र भुयार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीएक संबंध नाही. माझा केवळ एवढाच आक्षेप आहे की संजय राऊत म्हणाले, स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार यांचे मत पडले नाही, असा आरोप करण्यात आला होता. तेव्हा अगोदरच आम्ही स्वाभिमानी मधून आमदार भुयार यांची हकालपट्टी केलेली आहे. महाविकास आघाडीशी असलेले संबंध आम्ही यापूर्वीच तोडलेले आहेत. तेव्हा घोडेबाजाराचा आरोप होत असताना. कुठेतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव घेतले जात आहे, हे बरोबर नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com