दुष्काळात पाहुण्यांकडे जनावरे नेऊन घाला - राम शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नगर - सध्या दुष्काळ आहे. जनावरे संभाळायची चिंता असेल तर पाहुण्याकडे नेऊन घाला असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारणमंत्री व नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

नगर - सध्या दुष्काळ आहे. जनावरे संभाळायची चिंता असेल तर पाहुण्याकडे नेऊन घाला असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारणमंत्री व नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

पाथर्डीत ते लोकांशी बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.नगर जिल्ह्यामधील दुष्काळीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी जिल्ह्यामध्ये होते. त्या वेळी पालकमंत्रीही सोबत होते. पाथर्डी येथे काही शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्याकडे दुष्काळाच्या व्यथा मांडल्या. त्या वेळी पालकमंत्र्यांनी ‘‘दुष्काळात जनावरे पाहुण्यांकडे नेऊन घाला’’ असा अजब सल्ला दिला. मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी शहर हद्द वाढीसंदर्भात चर्चा सुरू असताना बोलताना सहजपणे शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान ‘‘ माझ्या वक्‍त्यव्याचा विपर्यास केला आहे’’ असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram shinde statement about Drought & Animals