
मिरज : ‘‘मिरज वानलेस (मिशन) हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ‘मिशन’ हाती घेतले असून, पूर्ण ताकदीने हॉस्पिटल सुरू होईल,’’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केला. चार वर्षे बंद राहिलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ‘जनसुराज्य’चे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पद्मश्री दिलीप कांबळे, अनुप जेटिया, हॉस्पिटलच्या संचालक डॉ. प्रभा कुरेशी, श्वेतपद्म कांबळे, विनोद निकाळजे, नाना वाघमारे प्रमुख उपस्थित होते.