राणी चन्नम्मा विद्यापीठाने विषय निवडीचे स्वातंत्र्य द्यावे; विद्यार्थ्यांची मागणी

पदवीत कन्नड विषय सक्ती मागे, विद्यापीठाच्या निर्णयाकडे लक्ष
Rani Channamma University
Rani Channamma University sakal

बेळगाव : पदवी अभ्यासक्रमातील कन्नडसक्ती राज्य सरकारने अखेर मागे घेतली आहे. मात्र, राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून कन्नड विषयाची याआधीच निवड करून घेतली असल्याने विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. तसेच परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यामुळे महाविद्यालयांसमोरही अनेक प्रश्‍न आहेत. यासंबंधी राणी चन्नमा विद्यापीठाने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी महाविद्यालये व विद्यार्थ्यांतून घेतली जात आहे.(Rani Channamma University Give freedom of choice of subject)

Rani Channamma University
कोरोना झालाय ? बूस्टर डोससाठी नवी नियमावली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात पदवी शिक्षणात कन्नड सक्ती करण्यात आली होती. यासंबंधी ७ ऑगस्ट २०२० रोजी सरकारने एक आदेश काढून ही सक्ती लागु केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही सक्ती करू नये असा पुन्हा एक आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांनी विषय निवड केली आहे. मात्र, अनेकांना हा विषय अवजड झाला आहे.

Rani Channamma University
पुण्यातील शाळा बंदच राहणार, अजित पवारांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले आहेत.मात्र, अध्यापही पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज भरणा करण्यात आला नाही. यामुळे विद्यापीठाने एक पत्रक काढून विषय निवडीचे स्वातंत्र प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे. तसेच यानंतर परीक्षा अर्ज भरून घ्यावे. यामुळे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कन्नड विषय अवघड जात आहे. असे विद्यार्थी विद्यापीठाने विषय बदलून देण्याची मागणी करत आहेत. आपल्या आवडीचा विषय दिल्यानंतर येत्या पंधरा दिवसात ते महिनाभरात आम्ही अभ्यास करून परीक्ष देवू असेही त्यांचे म्हणणे आहे. यालाही प्राध्यापकांतून संमती दिली जात आहे. मात्र, काही महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः कन्नड विषय निवडला असल्याने त्या विषयातूनच त्यांनी परीक्षा द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. प्राचार्यांच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Rani Channamma University
'बजेट वाढले, पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनेक जिल्हे मागे पडले'

आम्ही परीक्षा लिहू शकत नाही

बेळगाव शहरातील काही महाविद्यालयात उत्तर भारतातील काही विद्यार्थी आहेत. ज्यांना कन्नड विषयच माहिती नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महाविद्यालयात इंटरनल टेस्ट घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘आम्ही परीक्षा लिहू शकत नाही. हा विषयच आम्हाला समजला नाही. हवं तर आम्हाला नापास करा’ असे वाक्य इंग्रजी भाषेत लिहून पूर्ण पेपर कोरो सोडला होता. याचा विचार महाविद्यालये व विद्यापीठाने करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com