कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कारप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला. जून 2018 ते मे 2019 दरम्यानच्या मुदतीत वारंवार घरी बोलवून बलात्कार केल्याप्रकरणी येथील सौरभ वायचळ (रा. गल्ली नं. 10) याच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला

जयसिंगपूर (कोल्हापूर) : घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कारप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला. जून 2018 ते मे 2019 दरम्यानच्या मुदतीत वारंवार घरी बोलवून बलात्कार केल्याप्रकरणी येथील सौरभ वायचळ (रा. गल्ली नं. 10) याच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला. कलम 376 सह अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला. 

हे पण वाचा - महाराष्ट्रातील नेते म्हणजे भुंकणारी कुत्री

पीडित तीस वर्षीय महिला संशयिताच्या घरी धुणी भांडी करण्याचे काम करीत होती. जून 2018 मध्ये एकेदिवशी घरी कोणी नाही, खूप कामे पडली आहेत तू ये असे संशयिताने महिलेला सांगितले. ती घरी गेली असता त्याने बेडरूम स्वच्छ करण्यास सांगितले. बेडरूम स्वच्छ केल्यानंतर घरी जात असताना संशयिताने बेडवर ढकलून तोंड दाबून बलात्कार केला. त्याने हे कोणाला सांगू नकोस, अन्यथा आमच्या घरातील सोने चोरलेस अशी खोटी तक्रार पोलिसांकडे करेन अशी धमकी दिली. त्यानंतरही सौरभने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. उष्टे खाण्यास नकार दिल्याने त्याने जातीवाचक बोलून अपमान केल्याची तक्रार महिलेने फिर्यादीत दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे तपास करीत आहेत. 

हे पण वाचा - ..आणि त्याच शववाहिकेतून सुधीरचा मृतदेह आणवा लागला 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on Worker Women in Kolhapur Gaysingpur