
सांगली : ‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी बनवू. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताकद देतील,’’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांचा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या सह्याद्री शासकीय निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा झाला, त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.