ऑक्टोबर महिन्यातच कच्चा आंबा दाखल

दोन महिने अगोदरच बाजारात; शहरातील फळ विक्रेत्यांकडे उपलब्ध
mango
mangosakal
Updated on: 

बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आणि सर्वांच्या पसंतीच्या आंब्याची चव चाखण्यासाठी नागरिकांना फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागत असते; मात्र बेळगाव शहरात ऑक्टोबर महिन्यातच आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला असून शहराच्या विविध भागात आंबे विक्री करणारे विक्रेते दृष्टीस पडू लागले आहेत.

चार-पाच दिवसांपासून शहरातील काही मोजक्या फळ विक्रेत्यांकडे मोठ्या आकारातील कच्चे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्यामुळे नागरिक स्वतःहून जाऊन आंबा कोणत्या प्रकारचा आहे आणि दर काय आहे, याची माहिती करून घेताना दिसून येत होते. आंबा कच्चा असला तरी चवीला चांगला असल्याने अनेकजण आंबे खरेदी करताना दिसून येत आहे. दोनशे रुपये किलो याप्रमाणे आंब्याची विक्री केली जात आहे.

आंबा उपलब्ध झाल्यानंतर खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत आहेत. विक्रेतेही मोठ्या संख्येने आंबे विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळेच सुरूवातीला काही मोजक्याच विक्रेत्यांकडे उपलब्ध असणारे आंबे अनेक लहान-मोठ्या विक्रेत्यांकडे दिसून येत आहेत.

सध्या आंब्याचा दर दोनशे रुपये किलो असला तरी ऑक्टोबर महिन्यात आंबा उपलब्ध झाल्याने अनेकजण आंबे खरेदी करू लागले आहेत. आंबा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांशी संपर्क साधला असता बंगळूर आणि परिसरातून आंबे उपलब्ध होत असल्याची माहिती मिळाली. शहरात कोकणातील सर्वाधिक प्रमाणात आंबे उपलब्ध होतात. मात्र कोकणातून उपलब्ध होणारे आंबे मार्चनंतर बेळगावात येतात, तर तर स्थानिक आंबे एप्रिल व मे महिन्यात उपलब्ध होतात. त्यामुळे नागरिकांना आंब्याची चव घेण्यासाठी आंब्याचा सिझन संपल्यानंतर प्रतीक्षा करावी लागते. मात्र यावेळी ऑक्टोबर महिन्यात आंबे उपलब्ध झाले आहेत.

mango
किसान मोर्चाने केले निलंबित; योगेंद्र यादव म्हणाले...

आंबा बाजारात उपलब्ध झाला आहे. आंबे खरेदीसाठी सध्या जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे दर कमी होणे गरजेचे आहे. दर कमी झाल्यास सर्वसामान्य माणसालाही आंबे खरेदी करता येतील.

- वैशाली पाटील, शहापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Marathi News Esakal
www.esakal.com