वाचा : या गावात होतो मरणाचा सोहळा 

श्रीकांत मेलगे 
बुधवार, 15 जानेवारी 2020

उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक 
अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी रमेश गणपाटील, सतीश शिंदे, राजाराम कोळी, सर्जेराव गणपाटील, सचिन घुले, बाळू डांगे, संभाजी काळे, विजय सूर्यवंशी, आनंदा अवताडे, नानासाहेब जाधव, तेजस गणपाटील, प्रकाश शिंदे, दादा जाधव, मारुती घुले, शंकर जाधव यांच्यासह श्री समर्थ बैठकीतील सदस्य परिश्रम घेत आहेत. 

मरवडे (सोलापूर) : मनुष्य जन्मानंतर जन्मसोहळा आनंदाने साजरा होतो; परंतु मरणानंतरही मरणाचा सोहळा मोजक्‍या लोकांच्याच नशिबी असतो. मृत्यूनंतर फार थोड्या कालावधीतच मृतक व्यक्तींच्या आठवणी पुसल्या जातात. या आठवणी वर्षोनुवर्षे जिवंत राहाव्यात म्हणून मरवडे (ता. मंगळवेढा) येथील ग्रामस्थांनी मृतकाच्या नावे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण रक्षणासाठी हे पाऊल उचलले जात असताना आता सर्वसामान्यांच्याही मरणाचा सोहळा साजरा केला जात आहे. 

हेही वाचा - अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!

जीवनाचा प्रवासात यश-अपयश 
प्रत्येकजण आपले आयुष्य सार्थकी लागावे म्हणून जीवनाचा प्रवास करत असतो. जीवनाचा प्रवास करत असताना यश-अपयश या दोन्ही गोष्टींला सामोरे जावे लागते. जगताना कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं; परंतु मरणानंतर काय हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. कुणी आपल्या मरणाचा सोहळा व्हावा, मरणानंतरही कुटुंब व समाजाने आठवण काढावी असे कार्य करीत आयुष्यभर झटत असतो, तर कुणाला आपले कौटुंबिक प्रश्‍न सोडवण्यासाठी उभी हयात घालवावी लागते. दुसऱ्यासाठी आयुष्यभर जगणारा माणूस मात्र मरणानंतर थोड्या कालावधीत विस्मरणात जातो. 

हेही वाचा- शिवसेनेचं ठरलं....आता बुथनिहाय शाखाप्रमुख अन्‌ जिल्हाप्रमुखनिहाय संपर्कप्रमुख 

पर्यावरणाच्या रक्षणासाठी संकल्पना 
मरणानंतरही सर्वांच्याच आठवणी सदोदित राहाव्यात व पर्यावरणाच्या रक्षणासाठी मरवडे येथील श्री समर्थ बैठक परिवाराच्या संकल्पनेतून गावातील मृतकाच्या नावे झाड लावून त्याचे संवर्धन करण्याच्या उपक्रमास नुकताच प्रारंभ करण्यात आला. मरवडे गावातील मृतक व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मृतकाच्या नावे झाड

मृतकाच्या नावे झाड लावल्यानंतर ग्रामस्थांबरोबर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यही मासिक, वर्षश्राद्ध व विधी निमित्ताने त्या वृक्षाच्या संगोपनासाठी प्रयत्न करतील. नुकतेच दामाजी फलोत्पादन संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल दगडू जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने स्मशानभूमीत झाड लावण्यात आले. या वेळी स्मशानभूमीतील संपूर्ण परिसराची स्वच्छताही करण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read: Dying ceremony this village