"कोरोना'मुळे या घातक आजारचा विसर; दहा वर्षात गेलेत एवढे बळी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

तीन वर्षात कर्नाटकात 7,212 लोकांना याची लागण होऊन 198 जणांचा मृत्यू झाला. 
बेळगावात 2015 मध्ये जिल्ह्यात एकूण 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सुमारे अडीच हजाराहून अधिक लोकांना लागण झाली होती. स्वाईन फ्लूसुद्धा कोरोनाप्रमाणे विषाणूमुळे होणार सांसर्गिक आजार आहे.

बेळगाव - जगभरात कोरोना व्हायरसची भिती कायम आहे. कर्नाटकात आतापर्यंत केवळ एकच कोरोनाबाधित आढळून आला असला तरी आरोग्य खात्याने राज्यात हाय अलर्ट घोषित केला. पण, मागील दाराने आधीच घरात प्रवेश केलेल्या स्वाईन फ्लूकडे (एच1एन1) सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. बदलत्या हवामानामुळे स्वाईन फ्लुने अनेकदा डोके वर काढले आहे. गेल्या दहा वर्षात 11,044 लोकांचा जीव गेला आहे. राज्यात चालू वर्षात 189 रुग्ण आढळून आले असून बेळगावातही त्याबाबत खबरदारी घेतली जात आहे. 

हे पण वाचा -  मंत्र्यांच्या समाेरच त्याने केला पत्नीला व्हिडीओ कॉल अन्...

स्वाईन फ्लू हा विषाणूंमुळे उद्धभवणारा प्राणघातक सांसर्गिक आजार आहे. 2010 मध्ये या आजाराने देशात प्रवेश केला. त्यावेळी 20,604 लोकांना याची लागण झाली होती. तर, 1,763 लोकांना जीव गमवावा लागला. नंतरच्या काळात त्याचा प्रभाव कमी झाला. पण, पुन्हा 2015 मध्ये स्वाईन फ्लूने देशात थैमान घातले. यावेळी देशात 42,592 लोकांना लागण झाली तर 2,270 लोक मृत्युमुखी पडले. याच कालावधीत बेळगावातील 15 लोकांना जीव गमवावा लागला होता. तीन वर्षात कर्नाटकात 7,212 लोकांना याची लागण होऊन 198 जणांचा मृत्यू झाला. 
बेळगावात 2015 मध्ये जिल्ह्यात एकूण 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सुमारे अडीच हजाराहून अधिक लोकांना लागण झाली होती. स्वाईन फ्लूसुद्धा कोरोनाप्रमाणे विषाणूमुळे होणार सांसर्गिक आजार आहे. स्वाईन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीवर वेळेत उपचार न झाल्यास सात दिवसात ती दगावते. तसेच तिच्या संपर्कात येणाऱ्या निरोगी माणसालाही त्याची लागण होते. त्यामुळे, कोरोनाप्रमाणेच स्वाईन फ्लूबाबत लोकांनी जागृत असणे आवश्‍यक आहे. 

हे पण वाचा - सैराटच्या आर्चीने सांगितले तिच्या यशाचे रहस्य

चर्चा नमस्काराची 
हस्तांदोलन करणे, माणसाच्या अति जवळ जाणे अशा कारणामुळे स्वाईन फ्लू, कोरोनाबाधीत व्यक्तीमुळे निरोगी व्यक्तीलाही त्याची लागण होते. त्यामुळे सध्या हस्तांदोलन करणे, मित्रांना गळाभेट देणे टाळले जात आहे. यावरुन बेळगावातही चर्चा रंगू लागली असून भारतीय संस्कृतीमधील हात जोडून नमस्कार करणे, यालाच अधिक प्राधान्य देण्याचे आवाहन केले जात आहे. 

अस्वच्छतेमुळे स्वाईन फ्लूचा प्रसार होते. सांसर्गिक आजार असल्याने त्याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. सर्दी, अति ताप अशी लक्षणे दिसून आल्यास सामान्य आजार समजून दुर्लक्ष करू नये. तातडीने त्यावर उपचार करुन घ्यावा. गर्दीपासून दूर राहावे. शक्‍यतो मास्कचा वापर करा. 
- डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: regardless of swine flu because corona corona virus