सैराटच्या आर्चीने सांगितले तिच्या यशाचे रहस्य 

rinku rajguru speech in belgaum
rinku rajguru speech in belgaum

खानापूर (बेळगाव) : सैराट करायचा ठरले तेव्हा काहीच येत नव्हतं. मीसुद्धा गर्दीतीलच एक होते. पण, जिद्द असेल तर सर्व काही शक्‍य आहे. त्यातून ऊर्जा मिळाली आणि सैराटने इतिहास घडविला. माझ्याप्रमाणेच यांच्यातीलही कुणीतरी पुढे येऊन माझ्यासारखीच या क्षेत्रात स्थिरावेल. त्यासाठी जिद्द बाळगा, असे आवाहन "सैराट'फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुने केले. 

महालक्ष्मी ग्रुपच्या रौप्यमहोत्सवानिमित्त रविवारी (ता. 8) महिला दिनाचे औचित्य साधून तिची मुलाखत आयोजित केली होती. वासुदेव चौगुले यांनी तिची मुलाखत घेतली. त्यावेळी तिने आपला जीवनपट उलगडला. हालक्ष्मीचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, रुक्‍मिणी हलगेकर व्यासपीठावर होते. 

ती पुढे म्हणाली, ऑडिशन म्हणजे काय हेसुद्धा माहीत नसताना मला दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी काम करण्याची संधी दिली. त्यानंतर बराच काळात अर्ची साकारण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. अर्चीसारखीच मी प्रत्यक्षातही संवेदनशील आहे. त्यावेळी चित्रपटातील काहीच माहिती नव्हती. त्यामुळे, आव्हान वाटले नाही. पण, काम करु लागले लागली, तसतशी आव्हाने येऊ लागली. ती पार पाडण्याची माझी तयारी असल्याने काही वाटत नाही. दिग्दर्शक नागराज मंजुळे माणूस म्हणून ग्रेट आहेत म्हणूनच ते ग्रेट दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना प्रचंड भीती वाटत होती. आनंद झाला होता. लोकप्रियता आणि यशामुळे जीवन बदलून गेलं. सामान्य जीवन संपुष्टात आले, याची खंत वाटते, असे तिने कबूल केले. 

कन्नडमधून "मनसू मल्लीगे' हा सैराटचा डब चित्रपट करताना खूप अडचणी आल्या. मुळात कानडी काही समजत नव्हते. कानडी शिकणं अवघड होतं, असे सांगत कानडीतून डॉयलॉग ऐकवताच प्रेक्षकांनी एकच गलका केला. अभिनय क्षेत्रात विशिष्ट असं कुणीच आदर्श नाहीत. पण, ही सुरवात असल्याने या क्षेत्रातील सर्वांचेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहीन. प्रेक्षकांसाठी चांगलं काही करण्याचे ध्येय आहे, असे रिंकूने नमूद केले. त्यानंतर श्री. हलगेकर यांनी सर्वांना संबोधित केले.

खरे नाव रिंकू नव्हे प्रेरणा 
रॅपिड फायर प्रश्नांना उत्तरे देताना तिने सर्वांचीच दांडी गूल केली. दिग्दर्शक समोर ठेवेल त्या अभिनेत्यांबरोबर काम करीन. या क्षेत्रात आले नसते तर डॉक्‍टर झाले असते. महेश मांजरेकरऐवजी ऐवजी नागराज मंजुळे हेच आवडते दिग्दर्शक आहेत, असे सांगून तिने चकीत केले. मुलाखतीत तिने तिचे खरे नाव प्रेरणा असल्याचे सांगताना सैराटमधील संवाद म्हणून मुलाखतीची सांगता केली. यावेळी जमावाला आवरणे पोलिसांना अवघड झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com