
टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना (Tembhu, Takari Irrigation Scheme) पूर्ण क्षमतेने चालवता येतील, अशी स्थिती आहे.
सांगली : कोयना धरणातून (Koyna Dam Water) आज १०५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विद्युत निर्मितीच्या दरवाजातून हा विसर्ग करण्यात येत आहे. सांगली पाटबंधारे विभागाने (Sangli Irrigation Department) या टप्प्यात साधारणपणे एक टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. यावर्षी कोयना धरण वेळेपूर्वीच शंभर टक्के भरले होते. त्यामुळे फारशी पाण्याची अडचण यंदा होणार नाही.