दुधोंडींला दिलासा : 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह, बाधितांपैकी 17 जण डिस्चार्ज

संजय कुंभार 
Tuesday, 14 July 2020

दुधोंडी (जि . सांगली) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जवळपास तीस अहवाल सोमवारी निगेटिव्ह आल्याने गेल्या पंधरा वीस दिवसापासून परिसरातील नागरिकांत असणारे भीतीचे वातावरण निवळले आहे.

दुधोंडी (जि . सांगली) : येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जवळपास तीस अहवाल सोमवारी निगेटिव्ह आल्याने गेल्या पंधरा वीस दिवसापासून परिसरातील नागरिकांत असणारे भीतीचे वातावरण निवळले आहे. सध्या दुधोंडीतील 24 एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सतरा रुग्णांना औषध उपचारानंतर घरी सोडले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. सध्या येथे क्वारंटाईन असलेल्या 23 जणांचे अहवाल प्रलंबित असले, तरी इथून पुढे आता धोका टाळा असल्याची माहिती तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे यांनी दिली. 

दुधोंडी परिसरात 14 जून ते 12 जुलै दरम्यान रुग्णाची संख्या बघता बघता 24 वर पोचली. अवघ्या काही दिवसांत रुग्ण वाढल्याने सर्व सुरळीत असलेले व्यवहार बंद पडले दुधोंडीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने हॉटस्पॉट बनलेल्या गावात भीतीचे वातावरण पसरले. मात्र प्रशासनासह आरोग्य विभाग ग्रामपंचायत यांच्यावतीने कोरोना तोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांना पलूस येथे क्वारंटाईन करण्यात आले.

मात्र सोमवारी जवळपास तीस अहवाल निगेटिव्ह आले. आता पलूस येते क्‍वारंटाईन असलेल्या 23 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःबरोबर इतरांची काळजी घेण्यासाठी दिलेल्या नियमाचे पालन करावे, आवाहन श्री. रानमाळे यांनी केले. दरम्यान, दुधोंडीतील चोवीसपैकी सतरा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर उर्वरिन सात रुग्णांवर मिरज येथे उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली 

नियमाचे पालन करावे

दुधोंडी परिसरात कोरोनाबाबत काळजी घेतली जात असून. गावात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी मास्क लावण्यासह नियमाचे पालन करावे. 
- विजय आरबुने, सरपंच, दुधोंडी 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relief to Dudhondi: 30 negative reports, 17 discharged