लॉकडाऊनमध्ये दिलासा : या जिल्ह्यात 61 हजार 780 टन धान्य वाटप

विष्णू मोहिते
Sunday, 12 July 2020

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना कालावधीत एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 61 हजार 780 टन धान्याचे पुरवठा विभागामार्फत वितरण करण्यात आले आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना कालावधीत एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 61 हजार 780 टन धान्याचे पुरवठा विभागामार्फत वितरण करण्यात आले आहे. केंद्राने नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत वाटपाचा निर्णय घेतला आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे 3 लाख 64 हजार 668 व अंत्योदय अन्न योजनेचे 32 हजार 32 असे एकूण 3 लाख 96 हजार 700 शिधापत्रिकाधारक आहेत. या दोन्ही योजनेंतर्गत जिल्ह्यातील 18 लाख 50 हजार लोकांना धान्य पुरवठा केला जातो. दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना 27 हजार 584 टन गहू व तांदूळ वाटला. प करणेत आलेला आहे. हे धान्य पॉस मशीनद्वारे वाटले असून त्याचे प्रमाण 98 टक्के आहे. 

कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकेमधील प्रत्येक व्यक्तीस 5 किलो तांदूळ व प्रति कुटुंब 1 किलो तूरडाळ, चनाडाळ मोफत दिले. तीन महिन्यांत 26230 टन तांदूळ व 872 टन डाळ वाटली. अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ठ नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना लॉकडाऊन कालावधीमध्ये सवलतीच्या दराने राज्य शासनामार्फत मे व जून 2020 या कालावधीसाठी 1 लाख 91 हजार 124 शिधापत्रिकाधारकांनी घेतला आहे. त्यांना 4046 टन गहू व 2697 टन तांदूळ दिला.

लॉकडाऊन कालावधीमध्ये केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत स्थलांतरीत व रोजंदार मजूर व विना शिधापत्रिकाधारकांसाठी माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांसाठी प्रत्येक व्यक्तीस 5 किलो तांदूळ मोफत व प्रत्येक कुटुंबास 1 किलो हरभरा मोफत वाटली. जिल्ह्यातील 9602 कुटुंबातील 31324 व्यक्तींना माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांसाठी 313 टन तांदूळ व 19.2 टन हरभरा डाळीचे वाटप झाले. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief in lockdown: Distribution of 61 thousand 780 tons of foodgrains in Sangali district