esakal | रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणी एलसीबीची दोघांवर कारवाई; मिरजेतील घटना

बोलून बातमी शोधा

null

रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणी एलसीबीची दोघांवर कारवाई; मिरजेतील घटना

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गजाआड केले. एक जण मिरज शासकीय रुग्णालयातील (कोव्हिड रुग्णालय) ब्रदर असून दुसऱ्या खासगी रुग्णालयातील लॅब असिस्टंट आहे. ब्रदर सुमित सुधीर हुपरीकर (वय 32, रा. मिरज), दाविद सतीश वाघमारे (25, विजयनगर) अशी त्या दोघांची नावे आहे. कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा राज्यात तुटवडा जाणवत आहे. यात काही जण काळाबाजार करताना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात काळाबाजार करणाऱ्यांची माहिती घेवून कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी दिले आहे. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक नियुक्त करण्यात आले आहे. विलिंग्डन महाविद्यालयाच्या गेटजवळ दोघेजण इंजेक्‍शनचा काळाबाजार करत असल्याची माहिती पथकातील सहायक निरीक्षक रवीराज फडणीस यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.

सुमित हुपरीकर हा मिरजेतील शासकीय रुग्णालयात अधिपरिचारक म्हणून कार्यरत आहे. तर दाविद वाघमारे हा सांगलीतील एका खासगी रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. मिरजेतील शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारकच काळाबाजार करत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विकास पाटील यांनी फिर्याद दिली.

रॅकेट शोधण्याचा प्रयत्न

दोघा संशयितांची कसून चौकशी केली जात असून यांचे रॅकेट असण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.