रेमडेसिव्हीरचा काळाबाजार! ‘सिव्हिल’मधूनच इंजेक्शन गायब

रेमडेसिव्हीर इंजेक्शन
रेमडेसिव्हीर इंजेक्शन Media Gallery
Summary

मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलच्या साठ्यातून प्रती व्यक्ती सहा डोस दिले जातात. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास शिल्लक डोस अधिपरिचारकाच्या ताब्यात असत.

सांगली : रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा (remdesivir injection) काळाबाजार (Black market)
प्रकरणी दुसऱ्या चौकशी समितीच्या अहवालानुसार रुग्णालयातूनच इंजेक्शन (injection) गायब झाल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. संशयित सुमीत हुपरीकर यानेच ते नेल्याचे अहवाल म्हटले आहे, अशी माहिती विश्रामबागचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी दिली. (remdesivir injection has been reported missing from a civil hospital in sangli)

रेमडेसिव्हीर इंजेक्शन
'सांगली जिल्ह्यातील रूग्णसंख्या दर कमी करणे आवश्यक'

अधिक माहिती अशी, की संशयित सुमीत हुपरीकर मिरज सिव्हिलमध्ये अधिपरिचारक आहे. त्याचा साथीदार दाविद वाघमारे खासगी रुग्णालयातील लॅबमध्ये टेक्‍निशियन होता. हे दोघे रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करीत होते. एक इंजेक्‍शन ३० हजार रुपयांचा विकत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार विश्रामबाग जवळ सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशी केली असता त्यांच्याकडे रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन सापडले. यापूर्वी त्यांनी ८९९ रूपयांचे इंजेक्‍शन ३० हजारांना विकल्याची कबुलीही दिली आहे.

रेमडेसिव्हीर इंजेक्शन
सावधान! 'दत्तक असं' होत नाही; सांगली प्रशासनाकडून इशारा

मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलच्या साठ्यातून प्रती व्यक्ती सहा डोस दिले जातात. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास शिल्लक डोस अधिपरिचारकाच्या ताब्यात असत. शिल्लक रेमडेसिव्हीर हुपरीकर आणि दाविद हे गरजूंना जादा दराने विकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी सविस्तर माहिती सिव्हिल प्रशासनाकडे मागितली. पहिल्या अहवालात माहिती अपुरी असल्याने पुन्हा मागणी करण्यात आली.

रेमडेसिव्हीर इंजेक्शन
कोल्हापूर, सांगली महावितरणच्या 500 कर्मचार्‍यांचा सेवाभाव

पोलिसांच्या मागणीनुसार सिव्हिलकडून आणखी एक चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार येथील दोन इंजेक्शन गायब झाले असून हुपरीकर याने ते नेल्याचे सांगितले. पोलिसांकडे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता त्या दिशेने तपास सुरू आहे. तपासात आणखी काही धागेदोरे पोलिसांकडून तपासले जात असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. (remdesivir injection has been reported missing from a civil hospital in sangli)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com